सिंधुदुर्ग : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकड्यात मात्र फारशी घट झालेली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्या राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. अशातच ऐन लॉकडाऊनच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जातं असल्याचं समोर आलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन असताना देखील राजरोसपणे गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी मधील विलवडे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दारू आणि कारसह 58 लाख 9 हजाराचा मुद्देमालासह जप्त केला आहे.

कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालयाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर कारवाई करण्यात आली आहे. यात 26 लाख 4 हजार रुपये रक्कमेची दारू पकडण्यात आली असून. एकूण 51 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तर 32 लाख 5 हजार रुपये रक्कमेची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक एन. पी. रोटे, दुय्यम निरीक्षक सी. एल. कदम, जवान सागर चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

एकीकडे जिल्हाच्या सीमा बंद असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीची दारूची वाहतूक कशी केली जाते असा प्रश्न सर्वसामान्य सिंधुदुर्गकरांना पडला आहे. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला सकाळी 11 वाजल्यानंतर फिरायला बंदी असताना राजरोसपणे गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू वाहतूक कशी केली जाते, असा स्थानिकांना पडला आहे. जिल्ह्यात दररोज गोवा बनावटीची दारु जप्त केली जाते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/3uIvahX News : राज्य राखीव दलाच्या जवानाचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवून लाखोंचा गंडा; पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

<a href="https://ift.tt/3fw0f3J Choksi First Photo: डोमिनिकामध्ये अटक झाल्यानंतर मेहुल चोक्सीचा पहिला फोटो हाती

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, शरीरावर सिगारेटचे चटके, नराधमाला बेड्या, डोंबिवलीत संतापजनक घटना

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/goa-made-liquor-seized-at-vilvade-sawantwadi-state-production-action-rs-58-lakh-worth-liquor-988684
0 Comments