Covid-19 vaccination : 18 ते 44 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणासाठी सोलापुरात राज सलगर यांची पोस्टरबाजी

<div dir="auto">18 ते 44 वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सोलापुरात अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील डफरीन चौकात केवळ एकट्याने पोस्टरबाजी करत तरुणांच्या लसीकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते राज सलगर यांनी हे अनोखं आंदोलन केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठा फटका बसला. यामध्ये अनेक तरुणांचे जीव देखील गेले. शहरात अनेक केंद्रावर लस शिल्लक राहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी देखील लसीकरण सुरू करावे अशी मागणी राज सलगर यांनी केली. प्रशासनाला निवेदन देऊन दखल घेतली जात नसल्याने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले असून जर लसीकरण सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा देखील राज सलगर यांनी दिला.&nbsp;</div>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-covid-19-vaccination-solapur-youth-banner-protest-to-start-the-vaccination-of-18-988688

Post a Comment

0 Comments