Modi Govt 2.0 : मोदी सरकार सत्तेची सात वर्षे पूर्ण करत असताना काँग्रेस मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. राज्यातील काँग्रेस नेते मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आलं आहे. इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारीसह विविध मुद्यांवरुन काँग्रेस राज्यभर आंदोलन केलं आहे.

मोदी सरकारला आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. तर एकूण कार्यकाळातील सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याचाच निषेध म्हणून काँग्रेस आज मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे मोदी सरकारविरोधात मुंबईत आंदोलन करणार आहेत. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार अमरावतीत, कोल्हापुरात सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण पुण्यात तर नाशकात बाळासाहेब थोरातही मोदी सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. त्याचप्रमाणे हे सर्व नेते मोदी सरकारविरोधात पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीतही 10 वाजता काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जाणार आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-congress-slams-7-years-of-modi-government-988687
0 Comments