Palghar oil leakage : डिझेलगळती रोखण्यासाठी तटरक्षक दलाचं ऑपरेशन

<p>तौक्ते चक्रीवादळामुळे 18 मे रोजी अलिबाग येथील भरकटलेलं जहाज पालघर मधील वडराई समुद्रकिनार्&zwj;यालगतच्या खडकावर आदळलं असून हे जहाज तब्बल अकरा दिवसानंतर ही याच ठिकाणी आहे . मात्र हे जहाज खडकावर आदळल्याने या जहाजातील अनेक भाग हे फुटले असून या जहाजातील डिझेल आणि ऑइल याची गळती सध्या समुद्रात सुरू असून या गळतीमुळे समुद्र किनाऱ्यालगत तेलाचे तवंग तयार होऊ लागले आहेत . याचा विपरीत परिणाम पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीवर होऊ लागला आहे. सध्या डिझेलगळती रोखण्यासाठी तटरक्षक दलाचं ऑपरेशन सुरु आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-palghar-coast-guard-operation-to-stop-oil-leakage-from-ship-988685

Post a Comment

0 Comments