<p>पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणारी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी आज खास बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकाळी दहा वाजता बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित असणार आहेत</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-congress-demands-withdrawal-of-decision-to-cancel-promotion-reservation-meeting-with-ajit-pawar-988899
0 Comments