SSC Exam : दहावीची परीक्षा होणार की नाही? आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी

<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतल्या गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे सध्याच्या काळात राज्यात दहावीची परीक्षा घेणं शक्य नाही, असं उत्तर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टात सादर केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकराने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचा दावाही या प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज मंगळवारी यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-maharashtra-ssc-exam-important-hearing-in-the-high-court-today-988900

Post a Comment

0 Comments