Devendra Fadnavis Meets Sharad Pawar : फडणवीस- शरद पवार भेटीकडे राजकीय हेतूनं पाहू नका : संजय राऊत

मुंबई : "शरद पवार आणि देवेंद्र फडवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे. शरद पवारांनी या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (31) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. स्वत: फडणवीस यांनी ट्वीट करत भेटीचा फोटो पोस्ट करत माहिती दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात काल संपूर्ण दिवस या भेटीची चर्चा रंगली होती. या भेटीनंतर महाराष्ट्राचं राजकारणाला नवं वळण मिळणार का, असंही म्हटलं जात आहे.

या भेटीविषयी आज (1 जून) संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "शरद पवारांची तब्येत किंचित बरी नाही, ही सदिच्छा भेट आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारणात शत्रूत्व घेऊन बसत नाही. जाणं-येणं असतं, एकमेकांशी चर्चा असते. त्यामुळे या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे."

"महाविकास आघाडी सरकारला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करणं गरजेचं आहे या संदर्भात पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असावं. या राज्याला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. शरद पवारही विरोधी पक्षनेते होते. त्यांनी त्यावेळी उत्तम काम केलं होतं. त्यामुळे फडवणीसांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं असावं," असं संजय राऊत यांनी सांगितलं.

source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-sanjay-raut-reaction-on-devendra-fadnavis-meets-sharad-pawar-988912

Post a Comment

0 Comments