<p>महाराष्ट्र सध्या <a href="https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19"><strong>कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना</strong></a> करतोय. पण अशातच आणखी एक धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात ज्या लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली होती, त्याची आकडेवारी समोर आली आहे. जी अत्यंत धक्कादायक आहेत. महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, केवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात जवळपास आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. </p> <p>महाराष्ट्र सरकारनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. सांगली शहरातील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्पेशल कोरोना वॉर्डही तयार करण्यात आला आहे. येथे सध्या पाच मुलांना कोरोनाची लागण झाली असून ते या स्पेशल वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-corona-maharashtra-covid-hits-8000-children-in-ahmednagar-988910
0 Comments