<a href="https://ift.tt/2S5bDLc Corona Cases : काल राज्यात 29,270 रुग्ण बरे होऊन घरी तर 15,169 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 94.54 टक्क्यांवर

Maharashtra Corona Cases : राज्यात काल तर 15,169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 29,270 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 285 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यात आज एकूण 2,16,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 54,60,589 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54% टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 285 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 674296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.

<a href="https://ift.tt/34KLRyB Choksi Petition : मेहुल चोक्सीची याचिका रद्द करण्याची डोमिनिका सरकारची कोर्टाकडे मागणी

Mehul Choksi : 14 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सी वास्तव्याला होता. याच बेटावरील डोमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सध्या मेहुल चोक्सी हा भारतातील प्रत्यार्पण रोखण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान डोमनिका सरकारने चोक्सीची याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे.

डोमनिका सरकारने याचिका रद्द करण्याची मागणी करत मेहुल चोक्सी याला भारताला थेट भारतात परत पाठवण्याची विनंती देखील कोर्टाकडे केली आहे. डोमनिका सरकारने पुढे म्हटले की, चोक्सीने दाखल केलेली याचिका सुनवणी योग्य देखील नाही. या प्रकरणी बंद न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायाधिशांनी सर्व पत्रकारांना आपले फोन बंद ठेवण्यास सांगितले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-june-3-2021-maharashtra-political-news-coronavirus-lockdown-news-989195
0 Comments