<p><strong>मुंबई :</strong> कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली यासह अनेक भागांमध्ये लसींचा साठाच उपलब्ध नाही. त्यामुळे लसीकरण मोहीमेला ब्रेक लावावा लागत आहे. राज्यात 2 जुलैपर्यंत लसीच्या उपलब्धतेवर खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आता लसीचा तुटवडा आणि दुसरीकडे लसीकरण हाच एकमेव पर्याय यातून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी मार्ग कसा काढायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे. </p> <p>सोलापूर जिल्ह्याला 24 जूनपासून लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी सोलापुरातील लसीकरण मोहीम पूर्णत: ठप्प आहे. अशीच काहीशी परिस्थिती राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-covid-19-vaccination-drive-stop-in-maharashtra-due-to-lack-vaccine-supply-992720
0 Comments