<p>सांगलीतील एका चष्मा दुकानदाराचा दुकानातील गर्दी नियंत्रित ठेवणाऱ्या पथकासोबत वादावादीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गर्दी नियंत्रण पथक चष्मा दुकान बंद करा असे सांगायला गेले होते. त्यावेळी तुम्ही सगळी दुकाने बंद करा, मी माझे दुकान बंद करतो. सगळ्या शहरात चष्मा दुकाने सुरू असताना आम्हाला का त्रास देताय असा चष्मा दुकानदाराने सवाल यावेळी केला. तुम्हाला काय पैसे पाहिजेत का?लाच पाहिजे का? देतो, असे चष्मा दुकानदार म्हणत त्याने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पथकाने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. विश्रामबाग चौकातील ही घटना आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sangli-police-and-optical-owner-video-viral-992715
0 Comments