<p><strong>नांदेड :</strong> कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात मेहुण्या मेहुण्यांच्या कार्यकर्त्यांत तुफान राडा झालाय. यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निमंत्रण नसल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शेकपा आमदार श्यामसुंदर शिंदे यांना जाब विचारत राडा घातलाय.या प्रसंगी प्रोटोकॉल नुसार खासदारांना कार्यक्रमास का बोलविण्यात आले नाही आणि सदर समारंभ खासगी आहे का? असे म्हणत खासदार आणि आमदार समर्थक आपापसात भिडल्यामुळे उपस्थितांची मात्र तारांबळ उडालीय. दाजी आणि मेहुण्यांच्या या भांडणात प्रशासनातील अधिकाऱ्यांची मात्र गोची झालीय. कंधार विधानसभा मतदारसंघात खासदारांचे दाजी आमदार श्यामसुंदर शिंदे हे मेहुणे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पारंपारिक मतदारसंघात निवडून आलेत तेंव्हा पासून आमदार दाजी मेहुणे कार्यकर्त्यात राडे होऊन चर्चा होणे हे आता नित्याचेच झालेय. त्यामुळे मतदार संघाच्या प्रगतीची चर्चा होवो की न होवो यांच्या रड्यांची चर्चा मात्र नित्याचीच झालीय. शासकीय कार्यक्रमात झालेल्या या राड्यावरून परस्परविरोधी तक्रारी नुसार कंधार पोलिसात कलम 143,147,149,152,353,कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nanded-mp-chikhalikar-and-mla-shinde-controversy-between-activists-992594
0 Comments