<p>रत्नागिरी जिल्ह्यात नऊ डेल्टा प्लस रुग्णांपैकी तीन बालकांना डेल्टा प्लसची लागण झाली होती. पण, या बालकांनी डेल्टा प्लसवर मात केली असून त्यांना घरी देखील सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. दरम्यान, एप्रिल ते मे या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास तीन हजार बालकांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये केवळ एका मुलीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि त्यावेळी बालकांना संभाव्य धोका लक्षात घेता आता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ratnagiri-three-children-successfully-fight-with-corona-delta-plus-variant-992595
0 Comments