<p>रत्नागिरी : डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या संगमेश्वरकरांसाठी दिलासादायक बातमी, डेल्टा प्लसचे रुग्ण सापडलेल्या पाच गावात कंटेनमेंट झोन उठवण्यात आला आहे. गेल्या चौदा दिवसांपासून धामणी, नावडी, माभळे, कसबा आणि कोंडगाव कंटेनमेंट झोनमध्ये होते. रत्नागिरीच्या प्रांन्ताधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन उठवण्याचे आदेश दिले आहेत. पाच गावातील डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाल्याने प्रशासनाचा निर्णय घेतला आहे. ओझरखोल आणि रेवाळेवाडी कोसुंब या दोन गावात कंन्टेंटमेंट झोन कायम आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ratnagiri-delta-plus-patients-in-sangameshwar-five-villages-containment-zones-remove-992494
0 Comments