<p><strong>मुंबई :</strong> ओबीसी असल्यामुळे राज्याचं महसूल मंत्रिपद मिळालं नाही अशी खदखद व्यक्त करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. "वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पाहावी," असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. "काँग्रेसने वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री बनवलं. बॅरिस्टर अंतुले यांना काँग्रेसने संधी दिली. वडेट्टीवार यांचं वय पाहिलं तर मोठी संधी पुढच्या काळात मिळेल, त्यांना थोडी वाट पाहावी लागेल," असं थोरात मुंबईत म्हणाले.</p> <p>"काँग्रेस बिलकुल जातीयवादी किंवा धर्मवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. वडेट्टीवार यांना वेगळं काहीतरी म्हणायचं असेल, आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला असेल. वडेट्टीवारांचं वय पाहिलं तर खूप मोठी संधी पुढच्या काळात मिळणार आहे. त्याकरता त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल," असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-vijay-vadettiwar-will-get-big-opportunity-in-the-future-says-balasaheb-thorat-992474
0 Comments