Maharashtra Corona Cases : राज्यात काल 11, 124 रुग्णांना डिस्चार्ज, 7,242 रुग्णांची भर
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 7242 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 हजार 124 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 75 हजार 888 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59टक्के आहे.

राज्यात काल 190 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 27 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 78 हजार 562 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), जालना (84), हिंगोली (69), वाशिम (85), गोंदिया (97), गडचिरोली (61) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Ind vs SL 3rd T20I: श्रीलंकेने रचला इतिहास, पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकली
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताला 7 गडी राखून पराभूत केले. यासह श्रीलंकेने ही तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. श्रीलंकेने दोन वर्षानंतर द्विपक्षीय टी -20 मालिका जिंकली आहे. याआधी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी -20 मालिका जिंकली होती. त्याचबरोबर भारताविरुद्ध पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ टी -20 मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. बर्थडे बॉय वनिंदू हसरंगा हा श्रीलंकेच्या विजयाचा नायक होता. पहिल्यांदा गोलंदाजीत हसरंगाने त्याच्या चार षटकांत केवळ 9 धावा देऊन चार महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. आणि नंतर 9 चेंडूत 16 धावांची नाबाद खेळी खेळली.

'पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी', मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पुर्तता करून लवकरात लवकर मिळावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागातील व्यावसायिक दुकानदार आणि नागरिकांना त्यांच्या विमा दाव्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्या अनुषंगाने विमा कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-july-30-2021-maharashtra-political-news-mumbai-rain-updates-hsc-results-996637
0 Comments