Maharashtra : थोड्याच वेळात Lockdownचे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मोठा निर्णय येण्याची शक्यता

<p>राज्यातले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात थोड्याच वेळात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. कारण दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री आणि राज्याचं कोविड टास्क फोर्स यांच्यात बैठक होतेय. या बैठकीत राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट १ पेक्षाही खाली आलाय. अॅक्टिव्ह आणि नव्या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल सुरू करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील दुकनांच्या वेळा संचारबंदी आणि इतर निर्बंधांबाबतही निर्णयाची शक्यता आहे. &nbsp;दुसरीकडे मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांच्यात होणा-या बैठकीचे तपशील ताबडतोब सादर करा अशा सूचना मुंबई उच्च न्यायायलयानं महाअधिवक्त्यांना दिल्या ाहेत. या बैठकीतल्या निर्णयावर कोर्टाच्या कामकाजासंदर्भात अनेक निर्णय अवलंबून आहेत.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-task-force-meeting-today-996561

Post a Comment

0 Comments