Breaking News LIVE : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर...

शेकापचे ज्येष्ठ नेते 'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख यांचे निधन
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले.  वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

गणपत देशमुखांना संपूर्ण राज्यभरात आबा नावाने त्यांना हाक मारली जात होती. गणपतराव देशमुखांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 साली सोलापूर येथे झाला.  1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्षात  होते.  1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.  2019 ला राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली.

शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी सुरेंद्र गडलिंग यांना हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी ॲड. सुरेंद्र गडलिंग यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी ॲड. सुरेंद्र गडलिंग यांना 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गडलिंग यांच्या दिवंगत आईच्या श्राद्ध विधींबाबत हा जामीन शुक्रवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मंजूर केला. गडलिंग यांच्या आईचं मागील वर्षी ऑगस्टमध्ये कोरोनामुळे निधन झालंय. मात्र त्यांचे काही विधी आणि शोकसभा अद्यापही झालेली नाही. वर्षपूर्तीच्या आधी हे विधी करायला हवे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी त्यांनी एका अर्जाद्वारे हायकोर्टाकडे केली होती. ती मान्य करत न्यायालयानं त्यांना 13 ते 21 ऑगस्टपर्यंत त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

Maharashtra Corona Cases : राज्यात काल 7,431 रुग्णांना डिस्चार्ज; 6,600 रुग्णांची भर
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6,600  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 83 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61टक्के आहे. राज्यात काल 231 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 77 हजार 494 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), जालना (92), हिंगोली (70), वाशिम (84), गडचिरोली (54)या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 001 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

from maharashtra https://ift.tt/3BWygn7
via IFTTT

Post a Comment

0 Comments