Ganpatrao Deshmukh : ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
गणपतराव देशमुख यांचे पार्थीव आज सकाळी आठ वाजता जन्मभूमी असलेल्या पेनूर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 या वेळेत त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी सांगोला येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात होणार असून दुपारी 1 वाजता सांगोला येथील शेतकरी सहकारी सुतगिरणी येथे गणपतराव देशमुख यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.
'विधानसभेचे विद्यापीठ' अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गणपत देशमुखांना संपूर्ण राज्यभरात आबा नावाने त्यांना हाक मारली जात होती. गणपतराव देशमुखांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 साली सोलापूर येथे झाला. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. सुरूवातीपासून गणपत देशमुख शेतकरी कामगार पक्षात  होते.  1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.  2019 ला राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली.
मार्च 1990, नोव्हेंबर 2004 आणि नोव्हेंबर 2009 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून विधानसेभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राज्यातील दुष्काळी भागाला मिळावे तसेच सांगोला तालुका पाणलोट विकास क्षेत्रामध्ये अग्रेसर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
1962-67, 1967-72, 1974-78, 1978-80, 1980-85, 1990-95, 1999-2004, 2004-2009, ऑक्टोबर 2009, ऑक्टोबर 2014 मध्ये विभानसभेवर 11 व्या वेळेस फेर निवड झाली होती.
संबंधित बातम्या :
शेकापचे ज्येष्ठ नेते 'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख यांचे निधन
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून आठवणींना उजाळा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ganpatrao-deshmukh-death-funeral-will-be-held-at-shetkari-sahakari-sutgirani-sangola-today-afternoon-996778
Post a Comment
0 Comments