<p>दहावीचा निकाल लागल्यानंतर आता <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/hsc-result">बारावीचा निकाल</a></strong> कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. 23 जुलैपर्यंत 12 वीचे निकाल बोर्डाकडे पाठवा अशा सूचना सर्व महाविद्यालयांना बोर्डाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही मुदत 24 जुलैपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पोस्टाने सुद्धा 25 जुलैपर्यंत शाळा निकाल बोर्डाकडे पाठवत होत्या. आता बोर्डाकडे शाळांनी तयार केलेले निकाल आलेत त्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र अद्याप तरी निकालाबाबत घोषणा झालेली नाही. आता २ ऑगस्ट म्हणजेच उद्या बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-hsc-results-2021-may-announce-tomorrow-996911
0 Comments