Maharashtra Monsoon : यंदा चार महिन्यांचा पाऊस अवघ्या दोन महिन्यांतच!

<p>वातावरणीय बदलांबाबत पर्यावरण तज्ज्ञ सातत्यानं त्याबाबत आवाज उठवत आहेत. मात्र त्याकडे बरेचजण दुर्लक्ष करतात. मात्र आता हे बदल आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत. &nbsp;यंदाच्या पावसाळ्यात चार महिन्यांचा पाऊस केवळ दोन महिन्यातच पडलाय. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंतची सरासरीची आकडेवारी जुलै महिन्याअखेरीस ओलांडली आहे. १७-१८ जुलैला तर पावसाचा कहर झाला होता. आणि राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली होती तर दरडीही कोसळल्या होत्या.. राज्यभरातल्या या घटनांमध्ये तब्ब्ल ३०० जणांनी जीव गमावलाय. आणि पावसाचा लहरीपणा यंदाही दिसून येतोय. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात लपून बसलेला पाऊस जुलैच्या उत्तरार्धात मात्र धूमाकूळ घालत कोसळला.. त्यामुळे वातावरणीय बदलांना गांभीर्यानं घेण्यातली दिरंगाई आपल्याला परवडणारी नाही.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-monsoon-climate-change-affects-monsoon-cycle-996796

Post a Comment

0 Comments