<p>मुंबईसह राज्यातल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार असून आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या गटातील जिल्ह्यांमध्ये मॉल्स, थिएटर ५० टक्के क्षमतेनं सुरु होऊ शकतात. तर सार्वजनिक मैदानं, वॉकिंग ट्रॅक खुले होऊ शकतात. याशिवाय दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी मिळू शकते आणि शनिवारीही सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-unlock-covid-restriction-will-ease-down-on-25-district-of-maharashtra-996795
0 Comments