<p style="text-align: justify;">औरंगाबादच्या वेदांतनगर परिसरात 19 ते 20 वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याला बेड्या ठोकण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. दरम्यान, या काचा नेमक्या कोणी फोडल्या याची अद्याप स्पष्टता नाही, पण वाहनांची ज्यांनी तोडफोड केली त्यांना पकडण्याचं आणि बेड्या ठोकण्याचे आवाहन सध्या औरंगाबाद पोलिसांसमोर आहे. </p> <p style="text-align: justify;">काल रात्री अज्ञात टोळक्यानं औरंगाबादमध्ये गाड्यांच्या काचा फोडल्या, यामध्ये महागड्या गाड्यांचा देखील समावेश आहे. काचा का फोडल्या याबाबत अस्पष्टता असली तरीही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गाडीत काही मिळेल या आशेने हे कृत्य करण्यात आले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/aurangabad-aurangabad-aurangabad-mob-vandalise-several-vehicles-abp-majha-1000702
0 Comments