Nagpur News : एकीकडे सत्ताधारी भाजपमधील काही नेते सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्यावर टीका करण्याची संधी शोधत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मात्र उद्योजकांच्या मंचावरून महात्मा गांधी व नेहरूंचे विचार मांडले. गांधी व नेहरूंच्या दोन गोष्टी अतिशय प्रसिद्ध आहेत. आपल्याला जास्तीत जास्त उत्पादनाची आवश्यकता आहे, असे नेहरू म्हणायचे. तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवून उत्पादन वाढविले पाहिजे, असे गांधीजींचे विचार होते. आमचेदेखील सर्वात जास्त प्राधान्य रोजगार निर्मितीवरच आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) नवीन विदर्भ विभागीय कार्यालयाचे गडकरींच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

विदर्भात रोजगार निर्मिती करूनच येथील गरीबी दूर होऊ शकेल. सुखी-समृद्धी विदर्भ हा कृषी व उद्योग क्षेत्राच्या विकासातूनच साकारू शकतो. विदर्भातील लोकांच्या आशा आकांक्षा विकासाशी जुळल्या आहेत. विदर्भ समृद्ध झाला तर महाराष्ट्र व पर्यायाने देश समृद्ध होईल. सीआयआयसारख्या उद्योजकांच्या संस्थांनी या दिशेने काम केले पाहिजे असे देखील गडकरी म्हणाले. रविवारी नागपूरमध्ये कन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारांची तुलना करत विदर्भ विकासासाठी प्रेरणादायी दिशानिर्देश दिले.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

"विदर्भात महाराष्ट्रातील 75 टक्के खनिजसंपत्ती, 80 टक्के जंगल आणि कोळशाचे विपुल साठे आहेत. या निसर्गसंपत्तीचा योग्य वापर करून हरित उद्योग, स्टील, कृषी प्रक्रिया आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करता येऊ शकतो. नागपूर हे मॉडेल सिटी म्हणून पुढे यावे.' असेही म्हणाले. तर ते पुढे म्हणाले कि, 'रोजगारनिर्मिती ही आमची प्राथमिकता आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून आणि विदर्भातून निर्यात वाढवून संपूर्ण क्षेत्र समृद्ध करता येईल. विदर्भ समृद्ध झाला, तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि त्यातून भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा आत्मनिर्भर भारताचा स्वप्न साकार होईल.' गडकरी यांनी विदर्भाला 'हरित उद्योग आणि एकात्मिक लॉजिस्टिक्सचे केंद्र” बनवण्याची गरज व्यक्त केली. 'नागपूर हे एक मॉडेल शहर बनू शकते, जिथे पायाभूत सुविधा उद्योगांना आधार देतात आणि लघुउद्योगांना उभारी मिळते,' असे त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

Pune News : कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण तापलं, तक्रारीसाठी मुली 12 तासांहून अधिक काळ आयुक्तालयाबाहेर, दिवसभर काय काय घडलं?

source https://marathi.abplive.com/news/nitin-gadkari-recalls-the-thoughts-mahatma-gandhi-and-pandit-jawaharlal-nehru-over-developmental-views-of-india-at-nagpur-maharashtra-politics-marathi-news-1374650
0 Comments