<p><strong>Maharashtra Live Blog Updates: पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन दलित मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्रभर ठिय्या मांडला. यावेळी रोहित पवार, सुजात आंबेडकरांनी या मुलींची भेट घेतली. सदर प्रकरणी पोलिसांवर कारवाईसाठी मुली ठाम आहेत. त्यामुळे कोथरुडमधील राजकारण तापलं आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. कारण मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज पार पडणार आहे, यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थितीत राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-4-august-2025-pune-kothrud-crime-news-mahadevi-elephant-maharashtra-politics-rains-weather-news-1374652
0 Comments