Bhaurao Chavan Sahakari Sakhar कारखान्याला चेन्नईच्या कंपनीकडून जवळपास 6 कोटींचा चुना

<p>जिल्ह्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला चेन्नईच्या एका कंपनीने विश्वासघात करून &nbsp;५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपयांचा चुना लावला आहे.&nbsp; यातील दोघांना मुदखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.भांबरे यांनी चार दिवस २ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.</p> <p>भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिलेल्या तक्रारीनुसार &nbsp;भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे युनिट क्र-३ हदगाव आणि युनिट क्र-४ वाघलवाडा यांच्या साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या एका कंपनीला दिले होते. साखर निर्यात केल्यानंतर भाऊराव कारखान्याला &nbsp;केंद्रशासनाकडून प्रतिटन काही आर्थिक मदत मिळत असते. पण संबंधित कंपनीने मात्र निर्यात केल्याची कुठलिही कागदपत्रे न सादर करता इंडोनेशिया या देशाने तुमची साखर नाकारली असल्याचा ईमेल पाठवला. पण त्यांच्याकडे अशी कुठलाही पुरावा नसल्याचे कारखान्याच्या लक्षात आले. यामुळे केंद्र शासनाकडून मिळणारी रक्कम &nbsp;५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपये आता मिळणार नाही. &nbsp;संबंधित कंपनीने कारखान्याची फसवणूक केल्याचे लक्ष्यात आल्यानंतर &nbsp;दि.२२ ऑगस्ट रोजी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 86/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 406 , 420 , 467 आणि 34 नुसार दाखल झाला.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-bhaurao-chavan-sahakari-sakhar-karkhana-chennai-company-1001449

Post a Comment

0 Comments