<a href="https://ift.tt/3zrs5WB Sports Day : आज 'राष्ट्रीय खेळ दिवस'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस

भारतात ज्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळी भारतीय हॉकीचे सुवर्णयुग सुरु होतं. त्यावेळी भारतीय संघात असा एक खेळाडू होती कि ज्याची किर्ती जगभर पसरली होती. या खेळाडूचे हॉकीतील कौशल्य असं होतं की, त्याच्या हॉकी स्टिकला बॉल चिकटला आहे का हे विदेशी लोक तपासायचे. हा खेळाडू म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यान चंद. आज त्यांचा जन्म दिवस. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भारतात आज राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात येतोय.

भारत देश गुलामीत होता त्यावेळी भारताची विदेशातील ओळख म्हणजे गांधी, हॉकी आणि ध्यानचंद अशीच होती. मेजर ध्यानचंद अर्थात ध्यानचंद सिंग यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रुपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले

भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना जागतिक क्रीडा विश्वात हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची खेळातली चपळता आणि कौशल्य जबरदस्त होतं. त्यामुळंच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.

हिटलरनं मागवली हॉकी स्टिक

मेजर ध्यानचंद यांच्या जीवनात 1936 चे बर्लिन ऑलिम्पिक हे सर्वात महत्वाचं होतं. या स्पर्धेत भारताचा अंतिम सामना थेट जर्मनीशी होता. हा सामना बघण्यासाठी स्वत: हिटलर हजर होता. पण त्यामुळे ध्यानचंद यांच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय संघाने लागोपाठ गोल करायला सुरु केल्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांची हॉकी स्टिक तपासण्यासाठी मागितली होती.

जर्मनी संघाला हारताना हिटलर पाहू शकत नव्हता. त्याने पहिल्या हाफ मध्येच मैदान सोडलं. पण धानचंद यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली. पण ध्यानचंद यांनी ती ऑफर विनम्रपणे नाकारली.

मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत 400 पेक्षा अधिक गोल केले, जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने 1956 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला.

पंढरपुरामधील नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील आरोपी तब्बल साडेतीन वर्षांनी गजाआड

नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील दोन फरार संशयित आरोपींना पंढरपूर पोलिसांनी थेट कर्नाटकमधील म्हैसूर येथून शिताफीनं अटक केली. तब्बल साडेतीन वर्ष या आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिला होता. पंढरपूर शहरातील भरवस्तीत असलेल्या भागात 18 मार्च 2018 रोजी नगरसेवक संदीप दिलीप पवार यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. संदीप पवार हे स्टेशन रोड वरील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले असताना अज्ञात लोकांनी कोयत्यानं वार करून आणि गोळ्या झाडून त्यांचा निघृण खून केला होता.

सरजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंडांच्या टोळीनं हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खून प्रकरणातील एकूण 27 आरोपींपैकी 24 आरोपींना पोलिसांनी अटक करून या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती.

उर्वरित फरार तीनपैकी सुनील वाघ आणि संतोष देवमारे हे दोघे आरोपी कर्नाटकमधील म्हैसूर येथे नाव बदलून आणि वेषांतर करून राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी म्हैसूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. काल (शनिवारी) या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी गेले साडे तीन वर्षे पोलिसांना गुंगारा देत आधी कोल्हापूर, बेळगाव आणि नंतर कर्नाटकातील म्हैसूर येथे राहत होते. या आरोपींची आपल्या कुटुंबाशीही थेट संबंध न ठेवल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. मात्र उशिरा का होईना पोलिसांनी मोक्का मधील या आरोपीना जेरबंद केल्यानं आता या हत्या प्रकरणात केवळ एका आरोपीचा शोध बाकी राहिला आहे.

from maharashtra https://ift.tt/3gJoYlA
via IFTTT
0 Comments