अटकनाट्यानंतर Narayan Rane पुन्हा कोकणात, सिंधुदुर्गात जमावबंदी ; BJP विरुद्ध Shivsena संघर्ष अटळ?

<p>रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्र आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस यंत्रणा कामाला लागली असून ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून गुरुवारी अर्थात काल लाँग मार्च देखील काढण्यात आला होता. तसेच सध्याच्या घडीला रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी बॅरिगेटींग देखील करण्यात येत आहे. तसेच संध्याकाळपर्यंत नारायण राणे आपला बालेकिल्ला म्हणजेच, सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. सिंधुदुर्गात सध्या जमावबंदी लागू करण्यात आली आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ratnagiri-narayan-ranes-janashirvaad-yatra-to-restart-curfew-at-sindhudurg-1000695

Post a Comment

0 Comments