मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीयत. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून राणेंवर पुन्हा हल्ला बोल केला. त्यानंतर नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात एबीपी माझाशी बोलताना मोठे गौप्यस्फोट केले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या Exclusive मुलाखतीत नारायण राणे यांनी म्हटलं की, मी ठाकरे कुटुंबियांना त्रास देणार नाही असा शब्द बाळासाहेब ठाकरेंना दिला होता. त्यांनी ज्या हेतूनं तो शब्द माझ्याकडून घेतला होता ते मी सांगू शकत नाही. पण आज जे काही घडतंय त्यामुळे मला हे बोलावं लागतंय. मला हे करायची इच्छा नाही शिवसेनेनं हे सगळे थांबवावे. माझं उद्धव ठाकरेंशी वैयक्तिक काहीही वाईट नाही. माझी प्रकरणं बाहेर काढायची आहेत तर काढा मग 'त्या' हत्या करायला कुणी सांगितल्या याची पण चौकशी करा असा खळबळजनक गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे.

source https://marathi.abplive.com/videos/news/politics-narayan-rane-exclusive-with-abp-majha-on-cm-uddhav-thackeray-shiv-sena-1001028
0 Comments