<p>कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कसबा गणपती मंदिर परिसरात भाजप घंटानाद आंदोलन करत असून मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/pune-pune-bjp-to-protest-to-reopen-temple-in-maharahstra-at-pune-kasba-peth-abp-majha-1001139
0 Comments