<p>कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.</p> <p>दरम्यान, माझाने भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी बातचिक केली, बावनकुळे यांनी सरकारच्या अनलाॅक धोरणावर टीका करत पुढच्या ७ दिवसांत मंदिरं उघडली नाही तर आम्ही मंदिरं उघडू असा इशारा दिला आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nagpur-chandrashekhar-bawankule-reaction-on-reopening-of-temples-abp-majha-1001141
0 Comments