Aurangabad : ... तर आम्ही मंदिरात प्रवेश करु, मंदिर खुली करण्यासाठी भाजपचा आक्रमक पवित्रा

<p>कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.</p> <p>दरम्यान, औरंगाबाद शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून मंदिरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी अडवल्याने त्यांना माघारी परतावे लागले. सरकारने यावर काही पावलं उचलली नाही तर आम्ही आक्रमकपणे मंदिरात प्रवेश करू असा इशारा औरंगाबादच्या भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/aurangabad-aurangabad-aurangabad-bjp-leaders-reaction-on-reopening-of-temple-abp-majha-1001146

Post a Comment

0 Comments