Ram Kadam : मंदिरं न उघडण्याचा सरकारचा तुघलकी निर्णय आम्हाला मान्य नाही : राम कदम ABP Majha

<p>कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.</p> <p>दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माझाने भाजपनेते राम कदम यांच्याशी बातचित केली. राज्यात सगळ्याच बाबतीत अनलाॅक होत असताना मंदिरांना का दिलासा नाही असा सवाल करत कदम यांनी सरकारवर टीका केली आहे. शिवाय, मंदिरं न उघडण्याचा सरकारचा तुघलकी निर्णय आम्हाला मान्य नाही असेही कदम यांनी म्हटले आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ram-kadam-ram-kadam-reaction-on-reopening-of-temple-abp-majha-1001149

Post a Comment

0 Comments