<p>बार्शीच्या मुख्य बाजारपेठेत एकाच रात्रीत ८ दुकानांवर चोरांनी दरोडा टाकलाय. मध्यरात्री ३ च्या सुमारास शटर उघडून चोरी केली. चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. बहुतेक दुकानं कपडे आणि इतर साहित्याची असल्याचं कळतंय. एकाच रात्रीत हजारोंचा माल लंपास केल्यानं व्यापारी व्यथित झालेत... तर, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-solapur-robbery-at-8-shops-in-barshi-main-market-overnight-1000863
0 Comments