गणेशोत्सवाच्या तोडांवर ST ची कोकणवासियांना भेट, Ratnagiri मध्ये 100% प्रवासी क्षमतेने ST Bus धावणार

<p><strong>रत्नागिरी :</strong>&nbsp;गावागावात वाहतुकीमध्ये एसटी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते. कोरोना आला आणि एसटीची सेवा थांबली. लॉकडाऊनमधील शिथिलता मिळत असताना एसटी काही पूर्ण क्षमतेनं धावत नव्हती. पण, गणेशोत्सवाच्या तोंडावर आता रत्नागिरी जिल्हावासियांना एक खुशखबर मिळाली आहे. कारण, आजपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. तब्बल दीड वर्षानंतर जिल्ह्यात एसटी पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. कोकणात चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. त्यामुळे एसटी सुरु झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. वस्तीच्या गाड्यांसह सर्वच गाड्या आता पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. तसेच एसटीला देखील यातून चांगला महसुल मिळणार आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ratnagiri-st-mahamandal-allowed-to-travelling-with-100-passengers-in-konkan-1001456

Post a Comment

0 Comments