<p>राज्यातील कोळसा तुटवड्याचं खापर केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर फोडलंय. केंद्राची राज्य सरकारकडे कोळशाची 3 हजार कोटींची थकबाकी आहे, तरी केंद्रानं कोळसा पुरवठ्यात राज्याची अडवणूक केलेली नाही. राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि बाहेरुन वीजखरेदी करुन नफेखोरी करण्याच्या उद्देशानं राज्यात कोळशाची टंचाई जाणवत असल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केलाय.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-3000-crore-coal-dues-to-the-state-yet-the-centre-did-not-obstruct-says-raosaheb-danve-1007937
0 Comments