Diwali Firecracker : फटाके फोडताना नऊ वर्षाच्या मुलानं डोळा गमावला, हिंगोलीतील घटना

Diwali Firecracker : पालकांनो, मुलांच्या हातात फटाके देण्यापूर्वी विचार करा. दिवाळीनिमित्त लहानांसह मोठेही फटाके उडवतात. दिवाळीचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी येतो, पण एका नऊ वर्षाच्या चिमुकल्याच्या आयुष्यात अंधकार घेऊन आलाय. फटाके फोडताना नऊ वर्षाच्या एका मुलाला डोळा गमावावा लागला आहे. दिवाळीमध्ये मुलांच्या हातात फटाके देत असाल तर सावधान! असेच म्हणावे लागले. दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असतानाच एका कुटुंबावर मात्र दु:ख ओढावलं आहे.

हिंगोलीच्या गोजेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  डीग्रस  येथील रहिवासी असलेल्या साईनाथ घुगे हा मुलगा आईसह दिवाळीसाठी मामाच्या गावी म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील गोजेगाव येथे दिवाळी साजरी करण्यासाठी आला होता. या नऊ वर्षाच्या मुलाला फटाके हातात देणे चांगलेच महागात पडले आहे. फटाका उडून डोळ्याला लागल्याने पूर्ण डोळा निकामी झाला आहे. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या साईनाथ ला तत्काळ नातेवाईकांनी नांदेड येथील रुग्णालयात हलवले आणि तेथील डॉक्टरांनी डोळा निकामी झाल्याचे नातेवाईकांना सांगितलं. दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी येतो परंतु साईनाथला हा सण अंधकार जीवनात ओढणारा ठरला. साईनाथचा पूर्ण डोळा निकामी झाल्याने त्याची आई धडधड रडत आहे.

अशी वेळ आमच्यावर आली परंतु हीच वेळ कोणावरही येऊ नये स्वतःच्या मुलांची काळजी घ्या आणि राज्य सरकारने प्रशासनाने तत्काळ फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी उपाय योजना आखाव्यात असे आवाहन अपघातग्रस्त मुलगा साईनाथचे आजोबा अशोक सांगळे यांनी केले आहे.

दीवाळीचा सण म्हटलं की गोड पदार्थांसोबत फटाके फोडले जातात. बच्चे कंपनी तर दिवसभर फटाके फोडून हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात.  मात्र, फटाके फोडताना थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर फटाका हा आपल्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलांची काळजी घ्या मुलांच्या हातात फटाके देऊ नका मुलांकडे लक्ष द्या आणि खबरदारी घ्या, असे अवाहन 'एबीपी माझा'च्या वतीने सुद्धा करण्यात येत आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/diwali-firecracker-9-years-child-eye-damaged-by-firecracker-1010241

Post a Comment

0 Comments