महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. 26 दिवस कोठडीत काढल्यानंतर आज आर्यन खान तुरुंगातून घरी परतणार, शाहरुख खान आर्थर रोड कारागृहाकडे रवाना, मन्नतवरही रोषणाई

2. नांदेडच्या देगलूरसह देशभरात 29 विधानसभा तर 3 लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, देगलूरमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला
आज नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनं देखील जोमानं प्रचार करुन निवडणुकीत रंगत आणली आहे. आज पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानं देखील जय्यत तयारी केली आहे. देगलूर पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 677 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत होणार मतदान होणार आहे.

3. ऊस बिलातून शेतकऱ्यांचं थकित वीजबिल वसूल करण्यासंदर्भात हालचाली, महावितरणच्या सूचनेनंतर साखर आयुक्तांची पाच जिल्ह्यातील साखर कारखानदारांसोबत बैठक

शेतकऱ्यांचं थकीत वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाच जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना याबाबतचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. या संदर्भात सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. महावितरणकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर हा आदेश देण्यात आला आहे.

4. पंढरपूरच्या पालखी मार्गाच्या उद्घाटनाची तारीख ठरली, 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालखी मार्गाचं उद्घाटन; पंतप्रधान ऑनलाइन उपस्थित राहणार

लाखो वारकरी पायी येणार्‍या संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता पूर्वी उभारलेल्या मंडपात हा कार्यक्रम होणार असून मोदी दिल्ली येथून या कार्यक्रमात सहभागी होतील आणि शुभारंभ करणार आहे. यावेळी नितीन गडकरी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , अजित पवार , देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्तिकी यात्रेच्या गडबडीत वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्याचा तोडगा काढला आहे.

5. फटाका फोडताना हिंगोलीतल्या 9 वर्षीय मुलानं डोळा गमावला, दिवाळीच्या तोंडावर सर्वांना सतर्क करणारी हिंगोलीतल्या गोजेगावमधली धक्कादायक घटना

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 30 ऑक्टोबर 2021 : शनिवार : ABP Majha

हिंगोलीच्या गोजेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय, एका नऊ वर्षाच्या मुलाने फटाके फोडताना आपला डोळा गमावलाय. पालकांनी मुलांच्या हातात फटाके देण्यापूर्वी विचार करावा. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांनुसार फटाके फोडणंदेखील टाळावं.

6. वादग्रस्त पंच किरण गोसावीविरोधात पुण्यात आणखी गुन्हा दाखल

मुंबई ड्रग्ज केस प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याच्याविरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गोसावीवर भारतीय दंड संहितानुसार कलम 420, 465, 468 यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तीन जणांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याचं पुणे पोलिसांनी माहिती दिली. सध्या फसवणूक प्रकरणी किरण गोसावी पोलिस कोठडीत आहे. पाच नोव्हेंबरपर्यंत किरण गोसावी याची पोलिस कोठडी आहे. पुणे पोलिसांनी किरण गोसावीला फसवणूक प्रकरणात पुण्यातील एका लॉजमध्ये पहाटे 3.30 वाजता ताब्यात घेतलं होतं.

7. सुरतमध्ये गटारावर फटाके फोडताना ब्लास्ट, थरारक व्हिडीओ समोर तर हिंगोलीत फटाक्याच्या नादात ९ वर्षीय मुलानं गमावला डोळा

8. एबीपी माझाचा प्रेक्षकांसाठी खास साहित्य फराळ, माझाच्या पहिल्या दिवाळी अंकाचं आज प्रकाशन, मान्यवरांच्या लेखांची मेजवानी

9. गावस्करांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्षे झाल्यानिमित्त एमसीएकडून गौरव सोहळा, पवार आणि ठाकरेंची उपस्थिती, वेंगसरकरांच्या नावानं वानखेडे स्टेडियमवर स्टँड

10. टी-20 विश्वचषकातील बांगलादेशचं आव्हान जवळपास संपुष्टात, सलग तीन पराभवनंतर बांगलादेशचं आव्हान संपल्यात जमा

सुपर-12 मध्ये सलग तीन पराभव स्विकारावे लागल्यानंतर बांगलादेश संघाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट विडिंज संघानं अखेरच्या चेंडूवर विजय मिळत आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. बांगलादेश आणि वेस्ट विडिंज यांच्यासाठी हा सामना करो किंवा मरो असा होता. महत्वाच्या सामन्यात वेस्ट विडिंज संघानं विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-30-october-2021-saturday-maharashtra-1010245
0 Comments