<p>राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एका राजकीय विश्लेषकानं ट्विट केलेल्या फोटोचा हवाला देत भाजपवर निशाणा साधलाय. राजकीय विश्लेषकानं अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट करून त्यांच्याबरोबर असलेली व्यक्ती ड्रग पेडलर असल्याचा दावा केला. या फोटोवर बोट ठेवत नवाब मलिक यांनी ड्रग पेडलरचं भाजप कनेक्शन काय असा सवाल केलाय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nawab-malik-post-photo-amruta-fadnavis-with-jaideep-rana-drugs-pedlar-1010515
0 Comments