<p>नमामी चंद्रभागा प्रकल्पातंर्गत नदी शुद्धीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सात गावांतून नदीत मिसळणारे सांडपाणी बंद करण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर, गुरसाळे या दोन गावात नमामि चंद्रभागा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाण्यामुळं चंद्रभागा प्रदूषित झालीय. चंद्रभागा नदीच्या काठावर १२० गावात स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाचं काम हाती घेण्यात आलंय.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pandharpur-namami-chandrabhaga-project-update-1010378
0 Comments