<p>देशभरातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. उद्यापासून रेल्वेचं नवं वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. १३ हजार प्रवासी गाड्या आणि ७ हजार मालगाड्यांच्या वेळेत हे बदल होणार आहेत. तर गॅस सिलेंडरच्या बुकींगसाठी आता ओटीपी द्यावा लागणार आहे. उद्यापासूनच हा नवा बदल लागू होणार आहे. त्यामुळे यापुढे ओटीपी दिल्यानंतरच ग्राहकाला गॅस सिलेंडर मिळणार आहे. तसेच उद्यापासून काही आयफोन आणि अॅन्ड्रॉईड फोन्समध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. Ice Cream Sandwich व्हर्जन आणि iOS 9 हे ऑपरेटींग सिस्टम असलेल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/india-changes-from-1-november-2021-1010379
0 Comments