Amitabh Bachchan यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या 'दिवार'वरून मुंबई महापालिकेचा सवाल ABP Majha

<p>रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत मोठी अडसर ठरतेय. मुंबई महापालिकेनं रस्ते रुंदीकरणासाठी कोणती पावलं उचलली याचा चार आठवड्यात अहवाल सादर करावा असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.. रस्त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंतीचा काही भाग तोडणं गरजेचं असल्याचा अहवाल सिटी सर्व्हे अधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात दिला होता. तरी देखील मुंबई महापालिकेनं कोणतीच कारवाई केली नसल्यानं काँग्रेसनं लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार केली होती. आता मुंबई महापालिका लोकायुक्तांना अहवाल सादर करताना कोणती सबब देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-lokayukta-questions-bmc-over-action-on-amitabh-bachchans-pratiksha-bungalow-1015365

Post a Comment

0 Comments