<p>आजपासून बेस्ट बस प्रवासासाठी तुम्हाला कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक असेल. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आता बेस्ट प्रशासनानं ही खबरदारी घेतली. त्यामुळे आजपासून 14 दिवस आधी म्हणजेच 16 नोव्हेंबरपर्यंत लशीचा दुसरा डोस घेतलेल्यांनाच बेस्टच्या बसनं प्रवास करता येणार आहे. त्यासाठी बस कंडक्टर, ग्राऊंड स्टाफ आणि बस तिकीट तपासणाऱ्यांना प्रवाशांचं लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याच्याही सूचना बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-government-makes-vaccine-certificates-compulsory-to-travel-with-best-1015191
0 Comments