6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका, प्रशासनाचे अनुयायांना आवाहन
6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका, प्रशासनाने अनुयायांना आवाहन केले आहे. ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येण्यास निर्बंध घातले जाऊ शकतात. महापालिकेकडून महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी शिवाजी पार्क येथे अनुयायांकरता व्यवस्था केली जाते मात्र,यंदा ती केली जाणार नाही. अनुयायांनी गेल्यावर्षीचे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे.

ST strike Updates : आज19 हजार 163 एसटी कर्मचारी कामावर परतले; महामंडळाची माहिती
एसटी महामंडळाच्या संपात सहभागी कर्मचारी हळू हळू कामावर परतू लागले. आज 19 हजार 163 कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाले आहेत. यामध्ये प्रशासकिय विभागातील 8 हजार 922, कार्यशाळेत काम करणारे 5 हजार 442, चालक 2 हजार 549 तर वाहक 2 हजार 250 पुन्हा एकदा कामावर परतले आहेत.

मानहानीच्या प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा, माझगाव कोर्टाकडून 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर, मोहित कंबोज यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार

मानहानीच्या प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा,
माझगाव कोर्टाकडनं 15 हजारांचा वैयक्तिक जामीन मंजूर,
भाजप नेते मोहित कंबोज यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार,
पुढील सुनावणी 30 डिसेंबरला

पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम, मार्गदर्शक सूचना बाबत पुन्हा एकदा टास्क फोर्ससोबत चर्चा करणार
पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम, मार्गदर्शक सूचना बाबत पुन्हा एकदा टास्क फोर्ससोबत चर्चा करणार, चाइल्ड टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर आज किंवा उद्या मध्ये पहिली ते सातवी च्या शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत शासन निर्णय जारी करणार असल्याची माहिती, चाइल्ड टास्क फोर्स सुद्धा पुढील बैठकीत नव्या मर्गदर्शक सूचना देणार, मात्र सध्यातरी चाइल्ड टास्क सदस्य सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक.

निवडणुकीत रिस्क नको! घोडेबाजार टाळण्यासाठी नागपूरचे भाजप नगरसेवक गोवा टूरवर
Vidhan Parishad Election Nagpur : नागपूर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत. (Chhotu Bhoyar vs Chandrashekhar Bawankule) उमेदवारी जाहीर केली आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-november-30-2021-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1015352
0 Comments