<p>आता बातमी कोल्हापुरातून... ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीचे नियम लागू करण्याचं ठरवलं. त्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट उभारुन तिथे कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आणि लशीच्या दोन डोसचं प्रमाणपत्र दाखवणाऱ्यांनाच प्रवेश देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचं दिसतंय. जिथे कालपासून चेकिंग अपेक्षित होती, तिथे २४ तासांनंतरही चेकपोस्ट उभारण्यात आलेली नाही. कोणतीही तपासणी न होता सरसकट वाहनं महाराष्ठ्रात प्रवेश करताना दिसताहेत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-no-corona-checkpost-on-toll-plaza-after-collector-order-1015579
0 Comments