Maharashtra Breaking News LIVE Updates :

सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती
नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले श्री सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.

पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 84 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 78 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 84 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496772 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 824 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3869 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आले चार प्रवासी, त्यातील एक प्रवासी पॉझिटिव्ह
पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून एक नागरिक पुण्यात आला आहे. महापालिकेने त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामध्ये ओमायक्रॉन हा नवा विषाणू आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक
कापूस सोयाबीन आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक. बुलढाणा शहर पोलोसांनी थोड्या वेळापूर्वी केली अटक. रविकांत तुपकर , त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर व इतर पाच जणांना केली अटक. दुपारी सर्वाना न्यायालयात केले जाणार हजर. अनेक गुन्हे अजामीनपात्र असल्याने जामीन न मिळाल्यास जावे लागणार कारागृहात.

या सरकारमध्ये अजित पवारांचे निर्णय फिरवतात - महापौर मुरलीधर मोहोळ
तीन पक्षाच्या राज्य सरकार मध्ये विसंवाद . अजित पवारांचा निर्णय राज्य सरकारने ने बदलला. नाट्यगृह ,सिनेमागृह पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलेला होता. मात्र त्याच दिवशी राज्य सरकारने अजित पवारांचा निर्णय डावलून 50 टक्के क्षमता ठेवण्याचा निर्णय घेतला. असं सारखं होतंय ,या सरकारमध्ये अजित पवारांचे निर्णय फिरवतात, शाळा सुरू करण्याबाबत ही संभ्रम, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्या बैठका घेऊन निर्णय घेऊ असं पुण्याची महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-december-01-2021-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1015545
0 Comments