<p>मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण लागलं असून यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतात. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे खुलासे केले जातात. आज भाजपच्या मोहित कंबोज यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशीसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-mohit-kamboj-made-serious-allegations-on-ncb-in-cruise-drugs-case-1011354
0 Comments