Nawab Malik on Mumbai Cruise Drug Case : आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एक नवा गौप्यस्फोट केला आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाचा पाढा वाचत या फर्जीवाड्यातील अनेक गोष्टी समोर ठेवत, नवे दावे केल. तसेच पुन्हा एकदा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.

आज नवाब मलिक पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, "2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत बातमी आली होती की, कॉर्डिलिया क्रूझवर रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक बातम्या पसरल्या की, एका मोठ्या सेलिब्रिटीच्या मुलाला या रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खानसह आठ जणांना अटक केल्याची बातमी आली आणि 6 ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर मी सांगितलेलं की, रेव्ह पार्टीच संपूर्ण प्रकरण बोगस आहे. आणि हा फर्जीवाडा चव्हाट्यावर आणत दोन व्यक्तींचा व्हिडीओ आम्ही सार्वजनिक केला होता. एक व्यक्ती केपी गोसावी, जो आर्यन खानला एनसीबी मुख्यालयात घेऊन जाताना दिसला होता. तर दुसरा अरबाज मर्चंटला घेऊन जाणाऱ्या मनिष भानुशाली नावाच्या व्यक्तीचा व्हिडीओ होता. या दोन्ही व्यक्ती यापूर्वीही एनसीबीच्या मुख्यालयात जाताना दिसले होते. आम्ही विचारलं होतं या दोन व्यक्ती कोण आहेत? जे हाय प्रोफाइल व्यक्तीला एनसीबी मुख्यालयात घेऊन जात आहेत? तीन वाजता आमची पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर पाच वाजता एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की, या दोन्ही व्यक्ती या प्रकरणातील पंच आहेत."

आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप

"त्यावेळी प्रश्न उपस्थित होत होते की नवाब मलिक असे सवाल का उपस्थित करत आहेत. त्यावेळी त्यांनी म्हंटल होत की, माझ्या जावयावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मी बोलत आहे. मी त्यावेळी बोललो होतो की, 13 जानेवारीला माझ्या जावयाला अटक करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत बोलताना पत्रकारांनीही मला विचारलं होतं, त्यावेळी मी बोललो होतो जर गुन्हा केला असेल तर कारवाई होणार.", असंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलं आहे.

"त्यानंतर आम्ही 9 तारखेला पुन्हा पत्रकार परिषद घेतली. एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासमोर ठेवला त्यामध्ये समीर वानखेडे आम्ही क्रूझ पार्टी ड्रग प्रकरणी 8 ते 9 जणांना ताब्यात घेतल्याचं बोलत होते. मी त्यावेळीही विचारलं होतं की, एक वरिष्ठ अधिकारी निश्चितपणे का सांगत नव्हता की, 8 जण होते की, 9 जण होते. त्यानंतर आम्ही त्याच दिवशी पुन्हा एक नवा व्हिडीओ जारी केला. त्यामध्ये 8 जण नाही, तर 11 जण असल्याचं स्पष्ट झालं होतं.", असं नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले की, "मी समीर वानखेडे यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी 11 लोकांना एनसीबीने पकडलं होत असे जाहीर केले होते. त्यावेळी मी अमीर फर्निचरवाला, रिषभ सचदेवा यांना घेऊन जाताना त्याचे चुलते दिसत होते. त्यावेळी आम्ही बोललो होतो की मोहित भारतीय जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांचा मेहुणा आहे. त्यावेळी वानखेडे बोलले की 14 लोकांना आम्ही पकडलं होत. त्यावेळी त्यांना नावं जाहीर करा असे बोललो होतो मात्र त्यांनी नावं जाहीर केलं नाही."

सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही

नवाब मलिकांनी सांगितलं की, सुनील पाटील याला मी कधीही भेटलो नाही. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. सुनील पाटील हा भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला मिळत आहेत. तो कोणत्या पार्टीचा व्यक्ती आहे हे मी बोलत नाही, असं मलिक म्हणाले. सुनील पाटील हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत. 6 तारखेला पाहिल्यादा मला सुनील पाटीलचा फोन आला. तो येतो बोलला त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील फोन आला मात्र तो आला नाही. तो आज येणार होता परंतु आज अखेर तो आलेला नाही, असंही मलिक म्हणाले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-cruise-drugs-case-live-updates-nawab-malik-sameer-wankhede-mohit-kamboj-press-conferance-live-updates-1011484
0 Comments