<p>ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या डेपोमध्ये कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे एसटी कामगार संघटनांच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यातील खराडी येथे 11 वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीनं विदर्भ आणि मराठवाड्यातले सर्व डेपो बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसटी कर्मचारी संघटनांच्या या वेगवेगळ्या भूमिकेमुळं संपकरी संभ्रमावस्थेत असल्याचं बोललं जातंय. पुढची दिशा ठरवताना कृतीसमितीला सोबत घ्यायचे की नाही यावरही बैठकीत होणार आज निर्णय होणार आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-st-organizations-to-decide-future-plan-today-1011485
0 Comments