<p> राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंट या सगळ्याला पुन्हा ब्रेक लावणार की काय अशी स्थिती निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व विभागांची बैठक घेणार आहेत. तर राज्य सरकारनं आता कठोर नियमावलीही जाहीर केली आहे. एकीकडे १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली होती. तर पुण्यात सिनेमागृहं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची तयारी झाली होती. पण नव्या व्हेरियंटमुळे आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. राज्य सरकारनं लसीकरणासंदर्भात कडक धोरण अवलंबलं आहे.((</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-omicron-corona-new-variant-threat-to-india-maharashtra-govt-strict-rules-1015017
0 Comments